बी एस सी
.
१) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे.
फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी.
तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त.
अॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त.
२) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा.
तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती).
३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही.
फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे.
तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही.
आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के Wacko सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही.
क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद ईन अॅडव्हान्स.
अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.
सल्लामाहितीचौकशीप्रश्नोत्तरेमदतशिक्षण
Log in or register to post comments
मुद्रणसुलभ आवृत्ती
10640 वाचने
प्रतिक्रिया
पिलीयन रायडर's picture
माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर
12 Jan 2015 - 1:58 pm | पिलीयन रायडर
माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर धागा.. हीच माहिती सध्या मी सुद्धा शोधत आहे.
SSC - मला हा अभ्यासक्रम पुरेसा वाटत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर CBSE हवा. पण मुळात आपला मुलगा डॉक्टर / इंजिनिअरच बनेल ह्याची काय खात्री? समजा सेफ साईड तसं धरलं तरी तो अभ्यास आपणही घरी करुन घेऊ शकतो असं मला वाटतय. मला कितीही इच्छा असली तरी चांगली CBSE जवळपास न सापडल्याने मी ह्या पर्यायाचा विचार करतेय. शिवाय माझ्या घराजवळ जुन्या प्रसिद्ध अनेक SSC च्या शाळा आहेत. शाळा घराजवळ असणे हा मुद्दा अत्यंत मह्त्वाचा असल्याने मी त्या शाळांचा विचार करतेय. ह्यांच्याही फीस तोडीस तोड आहेत.
ICSE - हे ऐकायला छान वाटतं.. पण मला स्वतःला अजुन ह्या ब्यासक्रामातुन पास आउट झालेलं कुणीही माहिती नाही. त्यामुळे ह्या अभ्यासक्रामातुन बाहेर पडून सामान्य मुलां सोबत बारावी - ग्रॅजुएशन केलं तर नक्की त्याचे फायदे तोटे काय हे मला माहिती नाहीत. ह्या अभ्यासक्रामात खुप सार्या माहितीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिल्या जातो. अनेक विषय असतात (सहावीलाच म्हणे १२-१३ विषय असतात).. काही पालक म्हणतात की आजकालची मुलं जास्त हुषार आहेत.. त्यांच्या बुद्धिला एवढं खाद्य लागतंच.. ह्या शाळांच्या फीस पण भरपुर आहेत.
मायबोलीवर ह्यावर पुष्कळ चर्चा झाल्याचं आठवतय पण दोन दिवस झाले मलाही लिंक सापडलेली नाही. तिथे कुणी तरी ह्या ३ अभ्यासक्रमांवर सविस्तर लिहिलं होतं.
तोवर ही एक लिंक पहा - http://www.thinkvidya.com/a/cbse-vs-icse-the-pros-and-cons-of-each-educa...
Log in or register to post comments
सामान्यनागरिक's picture
यश हे असल्या अभ्यासक्रामांवर अवलंबुन नसतं पूर्णतया !
19 Jan 2015 - 5:10 pm | सामान्यनागरिक
सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.
Log in or register to post comments
सामान्यनागरिक's picture
यश हे असल्या अभ्यासक्रामांवर अवलंबुन नसतं पूर्णतया !
19 Jan 2015 - 5:11 pm | सामान्यनागरिक
सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.
Log in or register to post comments
वारा's picture
धन्यवाद.. मिळेल ती माहीती चेक करतोय.
12 Jan 2015 - 2:16 pm | वारा
धन्यवाद....मिळेल ती माहीती चेक करतोय. साईट वर CBSE अभ्यासक्रम २०१४ - २०१५ अस का लिहीत आहेत? म्हणजे CBSE चा सिल्याबस दरवर्शी बदलतो काय?
Log in or register to post comments
hitesh's picture
.
12 Jan 2015 - 2:25 pm | hitesh
इंग्लिश मेडियम स्टेट किंवा फार्फार तर कॉन्वेंट फायनल केले आहे
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस
12 Jan 2015 - 2:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस.एस.सी. पॅटर्न बर्यापैकी औटडेटेड झालाय. १० वी-१२वी नंतर स्पर्धेमधे टिकायचं असेल तर अपडेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे. आय.सी.ए.सी विषयी फार माहिती नाही त्यामुळे बोलतं नाही.
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
SSC मध्ये गणित विज्ञानाचा
12 Jan 2015 - 3:03 pm | पिलीयन रायडर
SSC मध्ये गणित विज्ञानाचा काहितरी घोळ घातलाय म्हणे... पुस्तक बदलली आहेत की २ -२ पुस्तकं केली आहेत (म्हणजे NCRTE ची सुद्धा आणली आहेत) असं काय काय ऐकायला मिळतय... कुणाला काही माहिती आहे का?
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
हो गणिताचे आमच्या वेळी होतं
12 Jan 2015 - 4:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो गणिताचे आमच्या वेळी होतं तसं गणित आणि सामान्य गणित असे दोन इलेक्टिव्ह्ज ठेवलेत. ज्यांना पुढे करिअर मधे मॅथेमॅटिक्स अॅप्टीट्युडची विशेष आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. खरं तर वेडेपणाचा निर्णय आहे. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचा ह्या ना त्या प्रकारानी गणोबाशी संबंध येतोचं. काठिण्य पातळी आणि वापरामधे फरक असु शकतो. पण त्याला सामान्य गणित ही पळवाट अयोग्य आहे.
दहावी मधे सामान्य गणित घेतलेला विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी पदविका आणि पदवीकडे वळु शकत नाही.
Log in or register to post comments
पदम's picture
कॉन्वेंट शाळा बघा
12 Jan 2015 - 3:00 pm | पदम
मी माज्या मुलासाठि कॉन्वेंटच पसन्त केलि. त्याच्या वेळी मलापण खूप प्रश्न पडले होते.
Log in or register to post comments
रायनची आई's picture
आमच्या कडे गेल्या वर्षी
12 Jan 2015 - 4:42 pm | रायनची आई
आमच्या कडे गेल्या वर्षी माझ्या मुलाच्या एड्मिशन च्या वेळी हेच प्रश्न पडले होते..आमचा पहिला प्रेफरेन्स शाळा जवळ असण्याला होता..आणि आमच्या घराजवळ सगळ्या शाळा एस. एस. सी. बोर्ड च्याच आहेत..म्हणून आम्ही सगळा विचार करून त्याला घराजवळच्याच एका चांगल्या शाळेत त्याला घातल..अभ्यास तर काय आपण घरी पण करून घेऊ शकतो, आणि नंतर कॉलेज सगळ्यांची एकच असणार आहेत..
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
CBSE बेस्ट ! पण खात्री करून
12 Jan 2015 - 4:50 pm | स्नेहांकिता
CBSE बेस्ट ! पण खात्री करून घ्या की शाळेमध्ये फक्त CBSE अभ्यासक्रमच नाही तर टोटल CBSE Curriculum घेतला जातो. कारण CBSE बोर्डाची परीक्षा म्हणजे स्पेशल स्किल्स, अवेअरनेस, जनरल इंटरप्रिटेशन आणि बरंच काही असतं. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सहजपणे होतो.
ट्युशन मिळत नसेल तर एस. चांद यांची रेफरन्स बुक्स घ्या आणि स्वत: वाचून शिकवा मुलांना. तुम्हाला वाचायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. पुस्तकांच्या किमतीपण भरपूर आहेत.
Log in or register to post comments
अजया's picture
माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी
12 Jan 2015 - 5:06 pm | अजया
माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी सीबीएसईमध्ये शिकला आहे.सुरुवातीपासुन घेतल्यास सिबिएसई चांगला पर्याय आहे.एकतर विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम,मनाला येईल ते मंत्री नियम काढणार बदलणार असे काही फारसे नाही.मराठीचा पर्याय माझ्या मुलाने आठवीपर्यंत वापरला.नववी दहावी दोनच भाषा आहेत.त्यामुळे हिंदी द्वितीय भाषा घेतली आहे.मात्र सिबिएसई शाळेला त्यात प्रशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग हवा.नवशिक्या शिक्षकांचे ते काम नाही.
आॅब्जेक्टिव्ह पेपर नसतात.पेपरातला काही भाग जास्त पर्यायातला एक निवडा असा असतो.
मराठी पर्याय महाराष्ट्रातल्या शाळेत तर मिळतोच .बहारिनच्या सिबिएसई शाळेत पण होता.
दहावीपर्यंत ग्रेड पध्दत आहे.दहावीचा रिझल्ट एकत्रित ग्रेड पाॅइंट अॅवरेज असा दहापैकी गुण मिळतो.
टप्प्याटप्प्याने अभ्यासाची तीव्रता वाढत जाते.त्याची सवय हळूहळू मुलाना होत जाते.त्याप्रमाणेच अगदी तिसरीपासुनचे पेपर पॅटर्न्स असतात.
मुलांना रोज अभ्यास फक्त टेक्स्टबुकमधुन केलेला पुरतो.आपण लक्ष घालणे जरुरी आहे.ट्युशनची आवश्यकता आम्हाला फक्त दहावीच्या गणिताला लागली.रोज अभ्यास करण्याला पर्याय नाही.फक्त शाळेवर अवलंबुन राहणेही नाही चालु शकत.मी बरेच पालक शाळेला,अभ्यासक्रमाला मुलांच्या अपयशाचे कारण मानताना पाहिले आहे.पण ते सोयिस्कर स्वतःच्या असहभागाबद्दल बोलत नाहीत. ५०%शाळेचा आणि तेवढाच पालकांचा सहभाग हवा. शाळेत एका वर्गात ४० मुलं आणि तुमचा एकच तुमच्यासमोर.मुलांना काय येतं येत नाही का येत नाही हे सर्व आपण जाणून घेऊ शकतो.
अकरावी बारावी देखिल आम्ही सिबिएसईलाच कंटिन्यु करणार आहोत.इतका आम्हाला हा अभ्यासक्रम आवडतो! आम्ही म्हणजे आम्ही आणि आमचा मुलगा!नुसते आम्ही नाही!!
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
म्हणुनच मला CBSE हवं होतं..
12 Jan 2015 - 8:56 pm | पिलीयन रायडर
म्हणुनच मला CBSE हवं होतं.. पण जवळ २-३ च शाळा आहेत. पैकी २ भिकार आहेत. (त्या चक्क अपार्ट्मेंट टाईप एका बिल्डिंगच्या शाळा आहेत.. आणि त्यांना मैदानच नाही... मैदान नसलेली शाळा अजिबात नको...) आणि १ उरते ती भयानक महाग आहे. १ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही. (१० वीला मी काय फीस भरत असेन ह्या विचारानेच मला फेफरं आलं..) आता पर्याय फक्त २ च आहेत.. SSC and ICSE...
तर ICSE बद्दल थोडी माहिती कुणी देऊ शकेल का?
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
१ लाख फीस मी ३ वर्षाच्या
12 Jan 2015 - 9:01 pm | काळा पहाड
१ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही.
तुम्ही मिलेनियम बद्दल बोलताय ना?
Log in or register to post comments
खेडूत's picture
बहुधा नाही
12 Jan 2015 - 9:22 pm | खेडूत
बहुधा नाही.
त्यांची साठ हजारच्या आसपास आहे.,
त्यात फी शिवाय न्याहारी जेवण व संध्याकाळचे दूध पण देतात . घरचा डबा नेण्यास मुभा नाही
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
मिलेनियमच..
12 Jan 2015 - 9:28 pm | पिलीयन रायडर
मिलेनियमच..
आम्ही चौकशी केली तेव्हा "या वर्षी ७९ हजार आहे.. १०% वाढेल असं धरुन चाला" असं म्हणाले. त्यांचे फोर्म्स जस्ट ५-६ जानेवारीला भरायचे होते, काही कारणाने तेव्हा नाही भरता आले, त्यामुळे नक्की फीस किती आहे ते कळाले नाही.
मला इतक्या लहान मुलांना शाळेनी जेवण देणं आवडत नाही. माझ्या मुलाला मी जितकं उत्तम करुन देऊ शकते ते कुणीच १००-२०० मुलांच एकदम जेवण बनवणारा आचारी देऊ शकत नाही. दुसरं असं की त्या शाळेत मुल असणारे पालक भेटले, त्यांनी सुद्धा अशीच ८०-९० हजार फिस सांगितली आणि शिवाय "फाटक सर गेल्यापासुन पुर्वी सारखं वातावरण राहिलं नाही" असंही म्हणाले.
तिसरा मुद्दा असा की बुकलेस शाळा आहे. त्यामुळे घरी मुलं काही होमवर्क वगैरे करत नाहीत, अनेक पालकांना अशावेळी नक्की मुलाला काय कळतय काय नाही हे समजत नाही.
अशा अनेक आक्षेपांमुळे लाखभर फीस भरायचे धाडस माझ्यात तरी नाही..
Log in or register to post comments
आजानुकर्ण's picture
परीक्षा असतात का?
12 Jan 2015 - 9:30 pm | आजानुकर्ण
होमवर्क नसतो. मग परीक्षा असतात का? हल्ली १०वीपर्यंत परीक्षा नसतात असं ऐकलंय. मग मुलाला शिकवलेलं समजतंय की नाही हे कसं कळतं?
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
प्रत्येक आठवड्याच्या शीट्स
12 Jan 2015 - 9:39 pm | पिलीयन रायडर
प्रत्येक आठवड्याच्या शीट्स असतात. त्यावरुन काय ते समजुन घ्या आणि करुन घ्या मुलाचा अभ्यास... परीक्षांचं माहिती नाही.
पण मुलाला कळतय की नाही ह्याचा आई वडीलांना अंदाज येत नाही हे २-३ जणांनी सांगितलं...
Log in or register to post comments
खेडूत's picture
आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय.
12 Jan 2015 - 10:21 pm | खेडूत
आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय. सध्या तरी ठीक-ठीक .
परीक्षा यथातथाच असतात. आपण भरपूर वेळ द्यावा लागतो.
वर्षाच्या अधेमधे भारतात परतल्यामुळे जी मिळेल ती शाळा घेणे भाग होते.
पण पूर्वी अनेक वाईट शाळा पाहिल्यात त्या तुलनेत ही ओक्के वाटते .
प्रत्येक शाळेत काहीतरी उणीवा आहेतच.
शाळेतले जेवण आम्हालाही पटत नाही पण ते बिल्ट-इन फीचर आहे ! Sad
पुढे बाहेर रहायची वेळ येईल तेव्हां अशी सवय असल्याने जड जाणार नाही अशी समजूत करून घेणारे पालक पाहिलेत.
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
"ट्युशन फिस" किती आहे.. बाकी
12 Jan 2015 - 10:29 pm | पिलीयन रायडर
"ट्युशन फिस" किती आहे.. बाकी ट्रान्स्पोर्ट वगैरे सोडून द्या..
Log in or register to post comments
खेडूत's picture
व्यनि केलाय !
12 Jan 2015 - 10:58 pm | खेडूत
व्यनि केलाय !
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
म्हणजे SSC सोडून CBSE कडे
12 Jan 2015 - 5:07 pm | काळा पहाड
म्हणजे SSC सोडून CBSE कडे वळणे योग्य का? जर पाल्य अजून पहिलीत जायचा असेल तर?
Log in or register to post comments
अजया's picture
हो.सुरुवातीपासुन cbse हा
12 Jan 2015 - 7:06 pm | अजया
हो.सुरुवातीपासुन cbse हा चांगला पर्याय आहे असे मला वाटते.
Log in or register to post comments
विशाखा पाटील's picture
अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात
12 Jan 2015 - 6:55 pm | विशाखा पाटील
अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात CBSE चा अभ्यासक्रम उत्तम, पण अर्थातच पालकांची पाल्याबरोबर त्यात्या इयत्तेचा अभ्यास करण्याची तयारी हवी. यात जबरदस्तीने करावं लागण्यापेक्षा त्यांनाही (म्हणजे पालकांना) आनंद वाटायला हवा.
थोड्या अवांतराबद्दल क्षमस्व - CBSE ची 9 वी आणि 10 वीची Democratic Politics ची पुस्तके सर्वानीच जरूर वाचावीत अशी आहेत.
Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
माझ्याकडे शिक्षक नाहीत.
12 Jan 2015 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा मुलगा सीबीएसइ मधे शिकतोय. पण त्याच्या शिक्षकांवर त्याचा परफॉर्म्स ठरतोय. अनुभवी शिक्षक नसल्यामुळे त्याची जरा गोची होत आहे. मुळात त्या शिक्षिकेलाचा सीबीएसइ चा अभ्यासक्रम अजून नीट समजलेला नाही. मुलाला गणिताची ट्युशन लावली तो पर्यंत बरं चाललं होतं. ट्युशनवाला शिक्षकही कुठे तरी निघुन गेला याचं गणित पुन्हा खालावलं. मी त्या म्याथवाल्या शिक्षिकेला भेटलोय, आमचं ऐकुन घ्यायच्या ऐवजी तिचच सुरु असतं आम्ही कशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो, अभ्यासक्रम तसा टफच असतो पण मुलांचा परफॉर्म्स आता सुधारु लागला आहे, मी व्यक्तिगत लक्ष घालते असं म्हणुन ती माझी बोळवण करते आहे, मला माझ्या गावी तीच एक शाळा बरी असल्यामुळे काही दुसरा पर्याय नाही.
-दिलीप बिरुटे
Log in or register to post comments
आजानुकर्ण's picture
आयला बरंच अवघड झालंय
12 Jan 2015 - 9:25 pm | आजानुकर्ण
आयला बरंच अवघड झालंय... जास्त पर्याय असल्याने फायदा होतो की नुकसान असा प्रश्न पडतो.
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले. माझे एकदोन चुलत नातेवाईक सीबीएससी बोर्डातले आहेत. सीबीएससी बोर्डाचा नोकरी/पुढील शिक्षणात प्रवेश वगैरे मिळवताना विशेष फायदा होत असल्याचे ऐकले नाही. नक्की काय परिस्थिती आहे?
Log in or register to post comments
सतिश गावडे's picture
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची
12 Jan 2015 - 9:43 pm | सतिश गावडे
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
अगदी हेच म्हणायचं आहे.
Log in or register to post comments
खटपट्या's picture
सेम हीअर !!
12 Jan 2015 - 10:28 pm | खटपट्या
सेम हीअर !!
Log in or register to post comments
नाखु's picture
मी सोत्ता आणि
13 Jan 2015 - 3:20 pm | नाखु
माझा ल्येक एस्.एस्.सी. वाले त्याने काही मोठा फरक जाणवेल काय?
कारण मी घरापासून फक्त ५ मिनिटाचे अंतरावरील (जाहीरातीप्रमाणे नाही खरोखर चालत) शाळेत पुढे खेळायला/अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून दाखल केले आहे लेक आणि लेकीला.
जाणकारांनी जरा इकडे प्रकाश टाकावा.
Log in or register to post comments
खेडूत's picture
सर्व व्यावसायिक
12 Jan 2015 - 10:51 pm | खेडूत
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात. याला सरकारी कारण म्हणजे विविध कर्मचारी नोकरीनिमित्य गावं बदलत असल्याने त्यांची मुलं सी बी एस ई / केंद्रीय शाळेत असतात. त्यासाठी सरकारी बाबुनीच हा निर्णय घेतला असणार.
त्यामुळे भविष्यातल्या सुविधेसाठी अनेक पालक इतर शाळातून काढून पाल्याला सी बी एस ई शाळेत घालताना दिसतात. हा प्रकार गेल्या चारपाच वर्षातला आहे.
आय सी एस सी अभ्यासक्रम घासू मुलं तयार करतो. पाठांतरावर बराच भर असतो. मात्र इथून मधेच परदेशात जायचं असेल तर तिकडे सहज प्रवेश मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्यांचे इंग्रजी उच्चार (व्याकरण नाही ) चांगले असतात. इतर वाचन भरपूर असते जे व्यवहारात कामाला येते. फार थोड्या चांगल्या शाळा प्रत्येक महानगरात असतील. पण प्रतिष्ठेपायी ही शाळा काढणाऱ्या भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो कारण या अभ्यासक्रमाचे शिक्षक मिळणे कठीण असते.
ग्रामीण भागात एस एस सी ला पर्याय नाही. अत्यंत लहान गांवातल्या आणि अतिसामान्य मुलाना समोर ठेवून हा अभ्यासक्रम केला असल्याने त्यातून पुढे येणारी मुले उर्वरित प्रकारातल्या मुलांच्या मानाने मागे असल्यासारखी फक्त वाटतात. मात्र चांगल्या एस एस सी शाळेत कमालीची चमकदार मुलं असतात !
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
Log in or register to post comments
सतिश गावडे's picture
सर्व व्यावसायिक
12 Jan 2015 - 11:25 pm | सतिश गावडे
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
माझी बारावी ज्या वर्षी झाली त्याच्या एक वर्ष आधी मेडीकल सीईटी चालू झाली होती. मी ही दिली होती आणि बी ए एम एसला प्रवेश मिळत होता. माझा ओढा इंजिनीयरींगकडे असल्याने मी ती सीट घेतली नाही. इंजिनीयरींगची सीईटी पुढे एक दोन वर्षांनी सुरु झाली. समजा माझ्या वेळीही इंजिनीयरींगला सीईटी असती तर मी ती नक्कीच उत्तीर्ण झालो असतो.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात.
हा गोड गैरसमज आहे. बारावी नंतरच्या इंजिनीयरींग/मेडिकलच्या सीईटीला मुल शिकायला लागल्यापासून ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो. Smile
बाकी माहितीशी सहमत.
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
खरा मुद्दा हा आहे.
तीन वर्षांच्या बाळाला शाळा असं काय शिकवतात की ज्यासाठी त्या साठ पासष्ठ हजार फी घेतात?
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी.
12 Jan 2015 - 10:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्ड (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. एस.एस.सी. बोर्ड वाईट नाही हे मान्यं. पण जर तुम्ही अगदी आजचा एस.एस.सी. बोर्डचा अभ्यासक्रम आणि सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम अशी तुलना केलीत तर तुम्हाला लगेचं समजेल का सी.बी.एस.सी. म्हणतोय ते. सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे. अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम बाकी क्षेत्रात माहित नाही पण अभियांत्रिकीमधे तरी नक्की उपयोगी पडतो.
हुच्च शिक्षणासाठी त्या त्या प्रवेश समित्या परसेंटाईल वापरुन समसमान गुण करतात आणि त्यानुसार आणि कास्ट वगैरे गृहित धरुन मिळतो त्यामुळे सी.बी.एस.सी. चा थेट फायदा होत नाही हे मान्य.
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
सहमत
13 Jan 2015 - 12:19 pm | स्नेहांकिता
SSC Board वाईट होते असे मुळीच नाही. पण आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे त्यात सुधारणा करून CBSE बनवले तर ते poreferable नाही का ?
तुलना थोडी बादरायण आहे, पण मारुती 800 कार अजूनही चांगलीच आहेच पण म्हणून होंडा किंवा वोक्सवॅगन (परवडत असेल तर ) वापरणे नाकारावे का ?
Log in or register to post comments
आदूबाळ's picture
ध्येय काय आहे?
13 Jan 2015 - 3:22 pm | आदूबाळ
ध्येय काय आहे?
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
तद्वत - एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल, तर कोणतंही बोर्ड का असेना - काय फरक पडतो?
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे
13 Jan 2015 - 4:59 pm | स्नेहांकिता
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
वा वा ! प्रवास कसा झाला याला काहीच महत्व नाही का ?
एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल
कदाचित मार्क तितकेच पडतील आणि मुलाला/मुलीला त्याच कॉलेजात प्रवेश मिळेल. पण त्या मुलाच्या व्यक्तीमत्वात आणि ग्रहणक्षमतेत, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जो फरक पडेल, त्याला माझ्या दृष्टीने तरी फार महत्व आहे. शिक्षण हे त्याच्यासाठी रट्टा मारायची गोष्ट न राहता काहीतरी खरोखर शिकण्याची, करून दाखवायची गोष्ट होईल. शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण तो डोळसपणे ‘जगायला’ शिकेल, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल.
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
पसंद अपनी अपनी.. माझ्या बाबतीत उत्तर 'हो' असे राहील. माझ्या मुलाला सातवीपासून SSC बोर्ड बदलून CBSE ला घातले आहे. आणि त्याचे खूप चांगले परिणाम (मार्क्स व्यतिरिक्त ) मिळाले आहेत ! Smile
Log in or register to post comments
असंका's picture
हा फार चांगला मुद्दा आहे...
13 Jan 2015 - 5:21 pm | असंका
हा फार चांगला मुद्दा आहे...
कृपया थोडा अधिक विस्तार करू शकाल का?
मीही निर्णय घेणार आहे पुढील काही दिवसात...आणि आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलेला दिसतो आहे. तेव्हा आपल्या इतकं चांगलं कोणी सांगु शकेल असं वाटत नाही?
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
अवश्य.
13 Jan 2015 - 5:41 pm | स्नेहांकिता
माझा मुलगा सहावीपर्यंत SSC बोर्ड शाळेत होता. तेव्हा पठडीबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हता. कॉम्पुटर विषय होता पण फक्त पुस्तकात. प्रत्यक्ष हाताळायला पंधरा मिनिटे मिळे तेपण ग्रुपमध्ये.
सहामाही परिक्षा होईपर्यंत त्याचे प्रॅक्टिकलच्या बॅचमधे नावच नव्हते आणि हाईट म्हणजे विषय-शिक्षिकेला याचा पत्ताच नव्हता !
हे सगळे पाहून मी सातवीला त्याला CBSE शाळेत घातले. फी थोडीशी जास्त म्हंजे वर्षाला ३५०००. यात युनिफॉर्म, नाष्टा, जेवण वह्या पुस्तके आणि ट्रान्स्पोर्ट हे सगळे आले. वेगळी ट्युशन बंद केली. फारच चांगले परिणाम सहाच महिन्यात दिसले. वर्षाअखेर मुलगा प्रत्येक विषयात स्वत:हून रस घेऊ लागला. मार्क्स तर सुधारलेच, जनरल अवेअरनेस पण सुधारला. कॉम्प्यूटर माझ्यापेक्षाही लीलया हाताळू लागला.
तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत.
खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत.
पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे आणि
Log in or register to post comments
आदूबाळ's picture
प्रतिसाद आवडला. विचारात
13 Jan 2015 - 6:31 pm | आदूबाळ
प्रतिसाद आवडला. विचारात पाडलंत...
(दिल्ली दूर आहे अजून, पण उघडपणे दिसतंय की मला या विषयावर जास्त अभ्यास करायला पाहिजे.)
Log in or register to post comments
संदीप डांगे's picture
तिथे त्यांना रोज एक न्यूज
13 Jan 2015 - 9:25 pm | संदीप डांगे
तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत.
खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत.
पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे
>
अगदी हेच माझ्या मुलाला नाशिक च्या आनंदनिकेतन ह्या १००% मराठी शाळेत मिळत आहे. तेही फक्त रु.५,५०० वार्षिक. गणवेश, खाणे आणि ने-आण पालकांकडे. इतर कुठलाही छुपा खर्च नाही. आता माझा मुलगा बालवाडी २ मध्ये जाईल पण त्याची मागील दोन वर्षातली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत माझ्या मुलाची शाळेत जायची इच्छा व उत्साह यात खूपच फरक दिसतो. पाहुण्यांसमोर उगाच इंग्रजीतल्या कविता म्हणून दाखवण्यापेक्षा त्याचा व्यवस्थितपणा, टापटीप आणि समजूतदारपणा मला महत्वाचा वाटत आलेला आहे.
दहावीपर्यंतच्या मुलांचा एकंदर अंदाज घेतला असता मुले कुठेही बुजरी किंवा कालबाह्य वाटली नाहीत.त्यामुळे कुठलाही अभ्यासक्रम अथवा पद्धतीपेक्षा शाळेची गुणवत्ता फार महत्वाची आहे असे मला वाटते. शाळेची एकूण विचारधारा आणि शिक्षकवृंद ह्यांचा मुलांवर जास्त परिणाम होतो.
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण
14 Jan 2015 - 9:06 am | पिलीयन रायडर
मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण स्नेहाताई असं नाही का वाटत की तू जे मुद्दे मांडले आहेत ते शाळेशी निगडीत आहेत, अभ्यासक्रमाशी नाही...?
SSC बोर्डाची पण अशाच जबाबदारीने मुलांना सांभाळणारी शाळा (मितानच्या मुलीची आहे तशी) असती तरी तुझ्या मुलात हाच फरक दिसल असता..
अर्थात CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम जास्त चांगला आहे ज्यानी मुलांना १०-१२ ला निश्चित फायदा होत असणार..
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
नाही
14 Jan 2015 - 11:03 am | स्नेहांकिता
CBSE अभ्यासक्रमात या सर्व गोष्टीना मार्क्स असतात, त्यामुळे कंपल्सरी ऑब्झर्व्ह केल्या जातात. इतर शाळांमधे एखादीच शाळा हे सर्व ऑब्झर्व्ह करेल. CBSE मध्ये मुलांना त्यांचा कल पाहून डेव्हलप करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले आहे तसे SSC मध्ये नाही. SSC मार्क्स हे पूर्णत: मुलाच्या लिखित performance वरच अवलंबून असतात.
तसेच CBSE अभ्यासक्रम SSC पेक्षा फार वेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. इथे मुले उत्तरे लिहू शकतात का यापेक्षा त्यांना ते समजले आहे का यावर जास्त भर असतो. understanding हा कन्सेप्ट ssc बोर्डाच्या पुस्तकातच नाही. CBSE परीक्षापद्धतसुद्धा understandingवरच आधारित असते. पुस्तके पाहिली असता हे समजेल आणि CBSE बोर्डाच्या प्रश्नपेत्रिका पाहिल्यावर तर पूर्ण क्लिअर होईल.
आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. आठवतील तशा लिहिते.
Log in or register to post comments
असंका's picture
धन्यवाद...
14 Jan 2015 - 11:14 am | असंका
धन्यवाद...
ही शाळा कोल्हापुरात तर नाही ना?
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
पूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी
14 Jan 2015 - 11:19 am | स्नेहांकिता
पूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी आहेत . खाली दिलेली link पहा.
Log in or register to post comments
असंका's picture
नैये...
14 Jan 2015 - 11:36 am | असंका
नैये...
बाकी त्यांचा पार्टनर सेक्शन बघितला. दोन वेगळया गोष्टी कळल्या. त्याबद्द्लही धन्यवाद.
Log in or register to post comments
मिहिर's picture
माझे शिक्षण एसएससी बोर्डात
12 Jan 2015 - 11:37 pm | मिहिर
माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
माझेही.
स्पर्धा परीक्षांचा इतका बाऊ का करताहेत ते कळले नाही. फक्त इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, तरी राज्यात शिकण्यासाठी लागणारी सीईटी ही एसेस्सीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. जेईईसारख्या परीक्षांचा विचार केला, तर त्या परीक्षा देणारा तसाही त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार असतोच, मग बोर्ड कुठले आहे त्याने कितीसा फरक पडतो!
बाकी मराठी माध्यमाचा कोणी विचारही न करताना पाहून वाईट वाटले.
Log in or register to post comments
अजया's picture
CBSE अभ्यासक्रम मुलाच्या
12 Jan 2015 - 10:15 pm | अजया
CBSE अभ्यासक्रम मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी चांगली करुन घेतो ,सायन्स आर्ट्स कॉमर्स कोणत्याही साइडला मुलं गेली तरी त्या विषयांबद्दल माहिती त्यांना पॉलिटिक्स्,इकॉनॉमिक्स्,सायन्स च्या त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाने मिळते.जे मला एसेस्सी मध्ये नाही आढळ्ले.
हल्लीच्या एन्ट्रन्स टेस्ट सिबिएस्सी च्या अभ्यासक्रमानुसार होतात.त्यामुळेही सुरुवातीपासून हा अभ्यासक्रम असणे सोयीचे पडते.
सर्व नॅशनल लेव्हल परिक्षांसाठी हाच अभ्यासक्रम लागतो.
मी स्वतः एसेस्सीबोर्डात शिकले आहे.पण डेंटल कॉलेजला गेल्यावर आमच्यातला आणि त्यावेळी दिल्ली बोर्ड म्हणायचे यांच्या कॉन्सेप्ट समजण्यातला फरक लक्षात आला.माझ्या बोर्डात ज्या विषयांची तोंडओळख होती त्याची व्यवस्थित समज आणि उमज त्या मुलांना होती.अजुनही हा मुख्य फरक किंवा मर्यादा एसएससी बोर्डात आहे.
मात्र चांगले अनुभवी शिक्षक असणारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष देउ शकणारी शाळा जर एसएससी बोर्डाची आहे तर नाकारू नयेच.
Log in or register to post comments
कोऽहम्'s picture
कप्तान चिमणराव यांच्याशी सहमत….
13 Jan 2015 - 12:10 pm | कोऽहम्
सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे -> ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुले स्वतःच विचार करायला लागतात आणि कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची सवय लागते.
आमच्या निकटवर्तीय आय. आय. टी प्राध्यापकांचे असे मत आहे की, सी.बि.एस.ई. चे विद्यार्थी विषयाचा गाभा/मूळ संकल्पना माहित असल्यामुळे नवीन /प्रगत कल्पना फार लवकर आत्मसात करतात आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य ह्या विद्यार्थ्यांमधे तुलनेने जास्त असते (हे मत माझे स्वतःचे नाही, आणि ह्याद्वारे इतर अभ्यासक्रमांचा वा विद्यार्थांच्या उणीवा दाखवण्याचा हेतू नाही. )
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
चिमणराव ^_^
13 Jan 2015 - 6:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणराव ^_^
Lol
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
अरे ते "चिमणराव" बघितलेच नाही
13 Jan 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा
अरे ते "चिमणराव" बघितलेच नाही Lol
Log in or register to post comments
वैदेही बेलवलकर's picture
एस.एस.सी.
13 Jan 2015 - 12:17 pm | वैदेही बेलवलकर
ह्याच विषयाचा गेले तीन महिने सतत विचार करून डोक्याचा पार भुगा झाल्यावर गेल्याच आठवडयात मुलीकरता एस.एस.सी. बोर्ड शाळेत प्रवेश घेतला आहे कारण नर्सरी करता १ लाख ४० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी १०% फी वाढ हे गणित आम्हाला तरी जमणारे नाही (भविष्यातील सर्वच गोष्टींचा विचार करून). सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई., आय. बी., सी. आय. ई. सर्वांचीच फी लाख-दीड लाखाच्या आसपासच.
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
हो ह्या बाबतीत सहमत. सी.बी.एस
13 Jan 2015 - 9:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो ह्या बाबतीत सहमत. सी.बी.एस.सी. शाळांच्या फिया काहीच्या काही असतात.
Log in or register to post comments
अजया's picture
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची
13 Jan 2015 - 10:30 pm | अजया
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी
13 Jan 2015 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.
Log in or register to post comments
आजानुकर्ण's picture
सॉलिड धंदा आहे
13 Jan 2015 - 10:21 pm | आजानुकर्ण
एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
मला वाटतं फी चा आणि CBSE
13 Jan 2015 - 10:47 pm | स्नेहांकिता
मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत.
झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
ही ती link
14 Jan 2015 - 11:10 am | स्नेहांकिता
http://www.mountlitera.com/center-locater/
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
तुझे एक एक प्रतिसाद वाचुन
14 Jan 2015 - 11:35 am | पिलीयन रायडर
तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे...
आता कसं व्हावं आमचं?
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
अगं पुण्यात बाणेरला एक शाळा
14 Jan 2015 - 11:40 am | स्नेहांकिता
अगं पुण्यात बाणेरला एक शाळा आहे असं ऐकलय. नक्की माहिती घेऊन व्यनि करते तुला दोन दिवसात.
Log in or register to post comments
असंका's picture
+१
14 Jan 2015 - 11:59 am | असंका
+१
Log in or register to post comments
पदम's picture
मी स.एस.सी. बोर्डातुन शिक्लेय
13 Jan 2015 - 12:18 pm | पदम
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
http://www.misalpav.com
13 Jan 2015 - 12:47 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/comment/649817#comment-649817
या प्रतिसादावरुन तर तुम्ही अनाहिता क्याटेगरी वाटलात Smile
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
आवरा..
13 Jan 2015 - 12:51 pm | काळा पहाड
आवरा..
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
मलाहि हेच वाटलं होतं.. की
13 Jan 2015 - 12:55 pm | पिलीयन रायडर
मलाहि हेच वाटलं होतं.. की तुम्हाला अनाहितामध्ये यायचय.. तुम्ही तसा प्रतिसादही कुठे तरी दिला होतात...
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
हा प्रतिसाद कोणासाठी??
13 Jan 2015 - 1:09 pm | टवाळ कार्टा
हा प्रतिसाद कोणासाठी??
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
तुमच्यासाठी नाही.. काळजी
13 Jan 2015 - 1:13 pm | पिलीयन रायडर
तुमच्यासाठी नाही.. काळजी नसावी...!
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
बघितले...उग्गाच मला
13 Jan 2015 - 1:15 pm | टवाळ कार्टा
Smile
बघितले...उग्गाच मला अनाहितांच्या विरोधातला बोलतात काही दू...दू...दू मिपाकर
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
तुम्ही?
13 Jan 2015 - 1:17 pm | पिलीयन रायडर
तुम्ही?
अनाहिताच्या विरोधात?
अनाहिताच्या?
विरोधात?
छे... शक्यच नाही!
Log in or register to post comments
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
मेल्या नको तिथं लक्ष तुझं.
13 Jan 2015 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
Lol
मेल्या नको तिथं लक्ष तुझं. बायकांवरचा तिसरा भाग टाक लौकर!! Lol
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
धीर धर...तस्ले फोटो नाही
13 Jan 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा
धीर धर...तस्ले फोटो नाही टाकणार आहे Wink
Log in or register to post comments
यसवायजी's picture
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी.
13 Jan 2015 - 10:33 pm | यसवायजी
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन.
(चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) Wink
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
मग सीबीएसई चा अभ्यासक्रम
13 Jan 2015 - 12:48 pm | काळा पहाड
मग सीबीएसई चा अभ्यासक्रम एसएससी का स्वीकारत नाही? जर फायदा होत असेल तर?
Log in or register to post comments
टवाळ कार्टा's picture
लोल
13 Jan 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा
लोल
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
अगदी भाबडा विचार...
13 Jan 2015 - 12:54 pm | पिलीयन रायडर
अगदी भाबडा विचार...
CBSE अर्थात स्टेट बोर्डापेक्षा चांगलं आहे.. पण आता नाही आमच्या घराजवळ ती शाळा... अशा केस मध्ये आपण घरी CBSE ची पुस्तकं आणुन मुलांना घरी समजावु शकतो ना.. शाळा जरी घोकंपट्टी करुन घेत असली तरी तीच गोष्ट कळेल अशा पद्धतीने, प्रयोगांमधुन, उदाहरणांमधुन आपण मुलांना सांगु शकतोच..
अजुन एक.. होमी भाभा सारख्या परीक्षांना बसल्यामुळे तसाही मुलं गणित आणि विज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करतात ना? मग स्टेट बोर्डाच्या मुलांना तोही एक पर्याय आहे...
Log in or register to post comments
श्रीगुरुजी's picture
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९
13 Jan 2015 - 12:58 pm | श्रीगुरुजी
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ वी व १० वी च्या गणित व शास्त्राच्या पुस्तकांची तुलना करा व स्वतःच ठरवा कोणता अभ्यासक्रम जास अवघड व आव्हानात्मक आहे ते.
बादवे, सीबीएसई च्या अभ्यासक्रमात हिंदी व इतिहास-भूगोल हे विषय भयंकर अवघड आहेत. हिंदीतले बरेचसे शब्द कळतच नाहीत. संदर्भाने अर्थ लावावा लागतो.
Log in or register to post comments
अजया's picture
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी
13 Jan 2015 - 2:21 pm | अजया
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी स्वतः मुलाचा अभ्यास घेते त्यावरुन सांगू शकते.अशी दोन सायन्सच्या पुस्तकांची तुलना करुन ठरवणे चुकीचे आहे.सुरुवातीपासुन एक अभ्यासक्रम असला की मुलांना बरोबर लिंक लागते.अापण अभ्यास घेत असतानाही सलग वाचत गेले की व्यवस्थित कळते.ही मुलं सुरुवातीपासुन हिंदी शिकत असतात.हिंदी हा अवघड विषय मुलाना वाटत नाही.एकतर फक्त पुस्तकावर आधारित पेपर नसतात.त्यात तेवढ्याच मार्काचा भाग व्याकरण, वाचन,उतारे असं सर्व असतं.शाळांमध्ये आठवीपर्यंत झालेले व्याकरण नंतर परत असते.त्यामुळे अवघड जात नाही.
मला स्वतःला त्यांची इतिहास भूगोल पाॅलिटिक्स ही पुस्तकं तसंच फिजिक्स आणि बायोलाॅजीचीही अावडतात वाचायला.
Log in or register to post comments
वारा's picture
धन्यवाद....
13 Jan 2015 - 1:45 pm | वारा
सर्व सदस्यांचे मनापासुन धन्यवाद.
खाली CBSE च्या अभ्यासक्रमाची लिंक आहे.
http://www.cbseguess.com/syllabus/2015/
Log in or register to post comments
असंका's picture
अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत?
14 Jan 2015 - 10:22 am | असंका
अहो धन्यवाद काय? काय ठरवलंत? काय विचार केलायत? काय सांगाल की नाही?
Log in or register to post comments
वारा's picture
२ जागी फॉर्म भरलेत.
14 Jan 2015 - 12:19 pm | वारा
२ शाळांमधे फॉर्म भरलेत. पहीली एस एस सी वाली आहे. पण ८० सिट आणि बरेच फॉर्म आहेत. लॉटरी लागली तर लागली. दुसरी सी. बी. एस. सी. अॅडमीशन मिळेल अस वाटतय. सी. बी. एस. सी.वाल्या बर्याच शाळांचे फॉर्म भरायच्या तारखा संपल्यात. एस. एस. सी. अजुन काही शाळा चालुच झाल्या नाहीत. एका शाळेत ४० % रिसर्व ४०% भाउबंध आणि राहीलेल्या सिट ईतर लोकांना. म्हणजे सरळ आहे, अॅड्मिशन नो गॅरंटी. परत रांगेत उभे रहा रात्री पासुन.
आय सी एस सी वाले म्हणतात कधीही या अॅड्मिशन देतो. पण शाळा प्रपोस्ड आय सी एस सी. बाकी ज्या शाळेत अॅड्मिशन मिळतय ती या वर्शा पासुन सी. बी. एस. सी. झालीय, म्हणजे आधीच्या बॅच एस. एस. सी. झाल्यात.
असो प्रोसेस चालु आहे.
Log in or register to post comments
स्नेहांकिता's picture
शुभेच्छा !
14 Jan 2015 - 12:21 pm | स्नेहांकिता
शुभेच्छा ! Smile
Log in or register to post comments
असंका's picture
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात
14 Jan 2015 - 12:47 pm | असंका
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात हे बेष्ट!!
(... पण शेवटी काय? एस एस सी चांगलं की सी बी एस ई? की शाळा चांगली असणं जास्त महत्त्वाचं? )
Log in or register to post comments
पिलीयन रायडर's picture
डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे
14 Jan 2015 - 1:38 pm | पिलीयन रायडर
डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे..
आम्ही कुठेही फॉर्म भरलेला नाही. बहुदा SSC साठीच भरु. कारण जुन्या शाळांमध्ये शिक्षक चांगले असतात.
Log in or register to post comments
पदम's picture
चुकिचि माफि अस्सावी
13 Jan 2015 - 2:36 pm | पदम
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलेय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन. शाळा मुलुन्डची मराठि विद्यालय.
Log in or register to post comments
चिगो's picture
५वी नंतर..
13 Jan 2015 - 3:31 pm | चिगो
५वी नंतर नवोदयच्या परीक्षेला बसवा.. क्लियर झाली तर बारावीपर्यंत पोर सी.बी.एस.ई.त शिकेल. ते पण फुकट.. हाकानाका..
फक्त पोरापासून सात वर्षं दुर रहायला लागेल. दर आठवड्याअखेर भेटू शकता म्हणा..
(नवोदयचा माजी विद्यार्थी) चिगो
Log in or register to post comments
शिद's picture
चांगली चर्चा चालू आहे.
13 Jan 2015 - 8:30 pm | शिद
चांगली चर्चा चालू आहे. सगळ्यांच्या अनुभवांवरून चांगलं मार्गदर्शन मिळतंय.
आम्हाला पण लवकरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
Log in or register to post comments
मितान's picture
मुलीला शाळेत घालताना शाळा
13 Jan 2015 - 10:21 pm | मितान
मुलीला शाळेत घालताना शाळा घराजवळ असणे, मैदान व इतर भौतिक सुविधा चांगल्या असाव्यात, अभ्यासेतर गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण असावे या किमान अटी होत्या. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून याचा आग्रह होता. सुदैवाने घरापासून १ कि मी अंतरावर अशीच शाळा आहे. त्या शाळेशी मी गेली १२ वर्षे जोडलेली असल्याने अंतर्गत व्यवस्थापन व शिक्षक माहितीतले आहेत. शाळेत झाडाला निळा जांभळा रंग दिलेला, कधीतरी स्वतःच स्वतःचा गृहपाठ ठरवून करण्याचा इथपासून अनेक नवे प्रयोग व मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते.५ वीपासून सेमी इंग्लिश आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका, भास्कराचार्य साठी गणित तयारी, समाज अभ्यासासाठी ७ वीपासून पुढे अभ्याससहली व शिबिरे, पोहणे,जिम्नास्टिक्,अॅथलेटिक्स, खेळ लायब्रेरी, गायनवादननृत्यचित्र इ स्वतंत्र शिकण्याची सोय, परदेशी भाषा व स्पोकन इंग्लिश लहान वयापासून शिकण्याची सोय हे सगळं असणारी शाळा कोणत्या बोर्डाची हा सवालच नव्हता. स्टेट बोर्ड मराठी माध्यमात मुलगी आणि आम्ही दोघे समाधानी आहोत.
दुसरी इयत्तेच्या मानाने प्रगती खूप चांगली आहे. नवे शिकायला आवडते. शाळा खूप आवडते. राहिला इंग्रजीचा मुद्दा. इंग्रजी भाषा म्हणून आवडत असल्याने आम्ही तिला इंग्रजीतूनही गोष्टी वाचून दाखवतो. कार्टून्स ती हिंदी न बघता इंग्रजीतून बघते. अनेक शब्द विचारते. हे सगळं तिला समजतं आणि ती उपयोगातही आणते. हा आत्मविश्वास येण्यात शाळेच्या वातावरणाचा आणि शिक्षकांचा नक्कीच मोठा सहभाग आहे.
हे सगळं करताना तिच्या शिक्षणात आमचा सक्रीय सहभाग आम्ही गृहित धरलाय आणि प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक चार गोष्टी नियमीत करत आहोत.
फायदे - शाळा ७ ते १२ असल्याने बाकीचा दिवस हातात आहे.
शाळा जवळ आहे. कधीमधी चालत जातो. पुढे तिची ती सायकलवर जाऊ शकेल.
घरातले आणि शाळेतले सांस्कृतिक सामाजिक वातावरण फार वेगवेगळे नाही.
समविचारी पालक भेटल्यामुळे छान पिअर ग्रुप तयार झालाय. त्यामुळे अभ्यासेतर गोष्टी मिळून करायला मजा येते.
मुलांना या वयात शिकायला आवडलं पाहिजे.ती भूक वाढली पाहिजे. स्पर्धा आवाक्यातली वाटली पाहिजे. हे सगळं होतंय.
तोटे - शालाबाह्य गटात आम्ही एकटेच एसेसी मराठी वाले असल्याने ही काय बोलते ते तिच्या बरोबरीच्या मुलांना कळत नाही. हिला मात्र आंग्लाळलेलं हिंदाळलेलं मराठी छान समजतं. मग ही त्या भाषेत बोलते. हे पिअर प्रेशर.
स्टेट बोर्डाच्या व सी बी एस सी च्या सुट्या वेगवेगळ्या असल्याने इतरांसोबत सुट्टी प्लान करता येत नाही.
बराच विस्कळीत झालाय प्रतिसाद. पण हे शेअर करावं वाटलं.
एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही.
कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये.
Log in or register to post comments
मुक्त विहारि's picture
मस्त प्रतिसाद....
13 Jan 2015 - 11:26 pm | मुक्त विहारि
"एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही."
"कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये."
१००% सहमत...
Log in or register to post comments
खटपट्या's picture
१०००% सहमत !!
13 Jan 2015 - 11:46 pm | खटपट्या
१०००% सहमत !!
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
फारसं सहमत नाहीये. १० वी
14 Jan 2015 - 1:36 am | काळा पहाड
फारसं सहमत नाहीये. १० वी पर्यंत सगळी टर्मिनॉलॉजी ही मराठीतून असेल आणि ११ पासून इंग्लिश मधून. अर्थात सेमी इंग्लिश हा काय प्रकार आहे ते माहीत नाही. पण जर गणित/सायन्स मराठी मधून शिकवणार असतील तर पुढे प्रॉब्लेम होवू शकतो.
Log in or register to post comments
खटपट्या's picture
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा
14 Jan 2015 - 3:16 am | खटपट्या
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा ८वी पासुन गणित आणि विज्ञान हे विषय ईंग्रजीमधून शिकवले जातात.
काही शाळात ५वी पासून तर काही शाळात ८वी पासून असे करतात.
Log in or register to post comments
काळा पहाड's picture
असं असलं तरी उदाहरणार्थ
14 Jan 2015 - 10:33 am | काळा पहाड
असं असलं तरी उदाहरणार्थ युपीएससी ला जाणार्या विद्यार्थ्यांना बर्याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार. त्यामुळे एकूणच हा प्रकार मर्यादित प्रमाणातच यशस्वी होणार. असे प्रयोग करण्यापेक्षा शिक्षणाचं प्रमाणीकरण करणं इतकं का अवघड आहे हे कुणी सांगेल? देशभर एकच अभ्यासक्रम आणि एकच गुणवत्ता प्रमाण हे ध्येय असायला काय हरकत आहे?
Log in or register to post comments
1 2 next last
मिसळपाववर स्वागत!
ithe
सदस्य आगमन
सदस्यनाम *
संकेताक्षर *
मिसळपावचे सदस्य व्हा !
नवीन संकेताक्षर बोलवा.
प्रवेश करा
भाषा बदला.
मराठी
English
बदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.
#मिपाफिटनेस
.
हॉटेलात आलेली माणसं
सध्या 27 सदस्य हजर आहेत.
प्रीत-मोहर
एस
आदूबाळ
महामाया
पलाश
खेडूत
ManishT
विनोद वाघमारे
दशानन
मिडास
टवाळ कार्टा
नि३सोलपुरकर
दीपक११७७
रामदास२९
सानझरी
राघवेंद्र
नन्दादीप
असा मी असामी
संजय क्षीरसागर
सन्दीप
vikramaditya
अनन्त्_यात्री
गॅरी ट्रुमन
पी. के.
सरल मान
गवि
अमरप्रेम
मिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:
1 आम्ही कोण?
2 मिसळपावचे आधिकारीक धोरण
3 मिसळपावचे आधिकारीक निवेदन
4 सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे
नवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:
1 सदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही
2 काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
3 मिसळपावची जडण घडण !
4 आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा
अभिप्राय देण्याविषयी:
1 मिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.
2 कृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.
3 सदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.
साहित्य संपादकांविषयी:
1 नमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.
2 त्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
© 2017 Misalpav.com, All rights reserved.
Disclaimer · Privacy policy · Login
परत वर जा